गुरुवार, 14 जनवरी 2021

Instat Gud ki roti

इन्स्टंट गुळाचीपोळी

बिना गुळाला शिजवता, बिना बेसन घालता केलेली इन्स्टंट गुळाची पोळी/ तिळ-गुळ पोळी खूपच चविष्ट लागते. . झटपट बनते त्यामुळे वेळ ही वाचतो व पोळी फुटण्याचे व गुळ तव्यावर वाहून तवा खराब होण्याचे टेंशन देखील नाहीं😊 तर एकदा जरूर करून बघा.



साहित्य 

दोन वाट्या गुळाची पावडर (पावडरच घेणे आवश्यक आहे)

अर्धी वाटी तीळ 

अर्धी वाटी  डाळं/ फुटाणा डाळ /पंढरपुरी डाळ 

अर्धा लिटर दुधावरची साय किंवा दोन मोठे चमचे साय

पारीसाठी 

एक वाटी मैदा एक वाटी गव्हांचं पीठ

 चिमुटभर मीठ 

एक चिमुट बेकिंग पावडर

४-५ मोठे चमचे तेल (मुठीचं मोहन)

कृती सर्वप्रथम गव्हाचं पीठ, मैदा मिक्स करून त्यात मीठ बेकिंग पावडर आणि तेल घालून थोडं थोडं पाणी घालत  घट्ट अशी कणिक मळा.    ही कणीक पंधरा ते वीस मिनिटं झाकून ठेवा  तोपर्यंत गूळ तयार करा 

त्यासाठी तीळ चांगले गरम होईपर्यंत भाजून घ्या मग त्याला थंड होऊ द्या थंड झाले की मिक्सर मधून बारीक करून घ्या . फुटण्याची डाळ बारीक दळून घ्या.

आता मिक्सरच्या मोठ्या पॉटमध्ये गूळ, दळलेली फुटण्याची डाळ ,साय आणि तीळ पावडर एकत्र फिरवून घ्या सगळं एकजीव होऊन घट्ट गोळा तयार होईल .

या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्या आता पारी करिता भिजवलेल्या कणकेच्या छोटा गोळ्या बनवा त्याला खोलगट करा त्यात  गुळाचा गोळा भरा आणि चारी बाजूंनी बंद करून आता याची पोळी लाटा हे( जसे आपण आलू पराठा बनवतो सेम तसे  )   आता याला गरम तव्यावर दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्या आवडीनुसार गरम किंवा गार खाऊ शकता  सोबत भरपूर तूप पण पाहिजे बरं😃

*पावडर गुळापासून केलेल्या ह्या पोळ्या करताना आणि भाजताना मुळीच फुटत नाही आणि गूळ देखील बाहेर येत नाही त्यामुळे तेव्हाही खरा होत नाही .




रविवार, 10 जनवरी 2021

Bhogi Chi Bhaji ( Mix Veg )

 Maharashtra ki Special Mix Veg  Bhogichi Bhaji

#भोगीचीभाजी 

'भोगी' हा संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा होणारा सण आहे

माहिती : cp

पौष महिन्यात 'संक्रांत' या सणाच्या आदल्या दिवशी साजरा केला जाणारा सण म्हणजेच भोगी सण होय!

भोगी शब्दाचा शब्दशः अर्थ आहे..

"आनंद घेणारा वा उपभोगणारा!"

कारण भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो!

पण भोगी या शब्दाचा या सणाला दुसराही अर्थ आहे! 

जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो, तेव्हा त्या नैवेद्याला "भोग" म्हणतात, 

याचप्रमाणे भोगीच्या दिवशी विशिष्ट पदार्थ तयार करून सवाष्णीला जेवावयास बोलावतात. तसे शक्य नसल्यास त्या पदार्थांचा शिधा तिच्या घरी पोहोचता केला जातो. यालाच "भोगी देणे" म्हणतात

या भोगी सणाच्या दिवशी विशिष्ट पदार्थ करण्याची पध्दत आहे. 

ते म्हणजे, बाजरीची किंवा ज्वारीची तीळ लावून केलेली भाकरी व लोणी, पावटे, गाजर, हरभरे, वांगी या सर्वांची मिळून केलेली लेकुरवाळी भाजी असा बेत करतात.

या दिवशी सवाष्णीला जेवायला बोलवतात. तिचे आदरातिथ्य केले जाते देवाची व सूर्याची पूजा करुन वरील पदार्थांचा नैवेद्य दाखवून सवाष्णसह सर्वजण एकत्र जेवायला बसतात.

जेवणानंतर सवाष्णीला दान- दक्षिणा देण्याची ही पध्दत आहे

वर सांगितल्याप्रमाणे जर सवाष्ण जेवायला येणे शक्य नसल्यास त्या पदार्थांचा शिधा तिच्या घरी पोहोचता केला जातो. यालाच भोगी देणे म्हणतात.

भोगी साजरी का करावी?

या दिवशी इंद्र देवाची आठवण काढली जाते. इंद्र देवाने आपल्या धर्तीवर उदंड पिकं पिकावी म्हणून प्रार्थना केली होती, अशी मान्यता आहे. ती पिकं वर्षानुवर्ष पुढेही पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते. या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुतीही दिली जाते. हिवाळ्याच्या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या येतात. शेताला नवीन बहार आलेला असतो. त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा लाभतो.मग या मोसमात शेतकरी भोगीची भाजी आणि तीळ मिश्रीत बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेऊन ऊबदाररूपी प्रेमाचा तो अनुभव घेतो, त्यामुळे पुन्हा वर्षभर शेतात काम करण्यास तो सज्ज होतात. मराठवाड्यात या भाजीला 'खेंगट' म्हणतात. संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो आणि या सणापासूनच नंतर महाराष्ट्रात सगळ्या सणांना सुरूवात होते. या सणाला भारतभर वेगवेगळी नावे आहेत. तामिळनाडूत हा सण "पोंगल " व आसाम मध्ये " भोगली बिहू " आणि पंजाब मध्ये " लोहिरी " ,राजस्थान मध्ये " उत्तरावन " म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जुन्या वाईटचा त्याग करून चांगल्या नव्याला अंगिकारलं जातं. नवा बदल केला जातो. म्हणूनच जुनं वाईट ते सगळं संपवून नव्या आरोग्यपूर्ण वर्षाची सुरुवात या दिवशी करायची. 

सणाला सर्व प्रकारच्या भाज्या एकत्र करून तयार केलेली भोगीची भाजी (यात प्रामुख्याने हरभरा, पावटा, घेवडा, वांगे, गाजर, कांद्याची पात, शेंगदाणा, वाटाणा, चाकवत, फ्लॉवर आदी भाज्या वापरल्या जातात.) तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी आणि खमंग खिचडी करण्याची परंपरा आहे. भोगीची भाजी भाजी अतिशय चवदार लागते. यात फोडणीला तीळ असतातच. भोगीला ही भाजी सर्वत्र केली जाते. मात्र ती करण्याच्या पद्धतीत थोडाबहुत फरक असतो. 

शुभ संक्रात




रेसिपी 

*भोगीची भाजी*

*साहित्य* 

अर्धी वाटी हरभरा दाणे

अर्धी वाटी वाल पापडी चे तुकडे 

अर्धी वाटी पावटा दाणे

अर्धी वाटी मटारचे दाणे 

एक मुठभर शेंगदाणे 

एक मोठा गाजर (लांब फोडी करून )

एक शेवग्याची शेंग सोलून तुकडे करून 

दोन मोठे चमचे तिळ+एक चमचा तीळ 

अर्धी वाटी खोबरे ( डोल किसून ) 

एक मोठा चमचा गुळ 

एक बटका चिंचेचा 

दहा-बारा लसूण पाकळ्या 

एक इंच आलं 

तीन चार हिरव्या मिरच्या 

एक वाटी कोथिंबीर (चिरून )

अर्धा चमचा हळद 

अर्धा/एक चमचा लाल तिखट  

दोन चमचे धणे पावडर 

एक चमचा गोडा मसाला 

१ वाटी तेल

१/२ चमचा जिरं 

मीठ.

*कृती*

शेंगदाणे गरम पाण्यात दहा मिनिटे भिजवून ठेवा .


तीळ आणि खोबरे वेगवेगळे भाजून घ्या.

आता तीळ, खोबरे, लसूण, आले, हिरवी मिरची कोथिंबीर हे सगळे एका मिक्सर पॉटमध्ये बारीक वाटून घ्या.


कढईत तेल गरम करा त्यात अर्धा चमचा जिरं एक चमचा तिळ घाला.

तिळ तडतडले की वाटलेला मसाला घालून चांगले भाजून घ्या.

त्यानंतर हळद, लाल तिखट, धणे पावडर, गरम मसाला घाला आणि मिक्स करा.

आता एकेक करून सगळ्या भाज्या व भिजलेले शेंगदाणे घाला .

चिंच, गूळ, मीठ आणि लागेल तेवढे पाणी घाला.

 ढवळून पंधरा ते वीस मिनिटं झाकून शिजवून घ्या सर्व्हिंग च्या वेळेस वरून थोडे तिळ घाला.

*आवश्यक भांडी*

एक मोठी जाड बुडाची कढई +झाकण

 मिक्सर छोटा चटणी पॉट,

मोठा चमचा भाजी हलवायला

सर्व्हिंग साठी बोल/कढई