इन्स्टंट गुळाचीपोळी
बिना गुळाला शिजवता, बिना बेसन घालता केलेली इन्स्टंट गुळाची पोळी/ तिळ-गुळ पोळी खूपच चविष्ट लागते. . झटपट बनते त्यामुळे वेळ ही वाचतो व पोळी फुटण्याचे व गुळ तव्यावर वाहून तवा खराब होण्याचे टेंशन देखील नाहीं😊 तर एकदा जरूर करून बघा.
साहित्य
दोन वाट्या गुळाची पावडर (पावडरच घेणे आवश्यक आहे)
अर्धी वाटी तीळ
अर्धी वाटी डाळं/ फुटाणा डाळ /पंढरपुरी डाळ
अर्धा लिटर दुधावरची साय किंवा दोन मोठे चमचे साय
पारीसाठी
एक वाटी मैदा एक वाटी गव्हांचं पीठ
चिमुटभर मीठ
एक चिमुट बेकिंग पावडर
४-५ मोठे चमचे तेल (मुठीचं मोहन)
कृती सर्वप्रथम गव्हाचं पीठ, मैदा मिक्स करून त्यात मीठ बेकिंग पावडर आणि तेल घालून थोडं थोडं पाणी घालत घट्ट अशी कणिक मळा. ही कणीक पंधरा ते वीस मिनिटं झाकून ठेवा तोपर्यंत गूळ तयार करा
त्यासाठी तीळ चांगले गरम होईपर्यंत भाजून घ्या मग त्याला थंड होऊ द्या थंड झाले की मिक्सर मधून बारीक करून घ्या . फुटण्याची डाळ बारीक दळून घ्या.
आता मिक्सरच्या मोठ्या पॉटमध्ये गूळ, दळलेली फुटण्याची डाळ ,साय आणि तीळ पावडर एकत्र फिरवून घ्या सगळं एकजीव होऊन घट्ट गोळा तयार होईल .
या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्या आता पारी करिता भिजवलेल्या कणकेच्या छोटा गोळ्या बनवा त्याला खोलगट करा त्यात गुळाचा गोळा भरा आणि चारी बाजूंनी बंद करून आता याची पोळी लाटा हे( जसे आपण आलू पराठा बनवतो सेम तसे ) आता याला गरम तव्यावर दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्या आवडीनुसार गरम किंवा गार खाऊ शकता सोबत भरपूर तूप पण पाहिजे बरं😃
*पावडर गुळापासून केलेल्या ह्या पोळ्या करताना आणि भाजताना मुळीच फुटत नाही आणि गूळ देखील बाहेर येत नाही त्यामुळे तेव्हाही खरा होत नाही .
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें